न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ७ एप्रिल) :- शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मंगळवारी (दि. ९) रोजी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शनही केले जाणार आहे.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील दुपारी एक वाजता अर्ज दाखल करणार आहेत. त्याअगोदर आंबेगावपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे.
यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री व पुण्याचे उमेदवार गिरीश बापट, खेडचे आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिरुरचे बाबुराव पाचर्णे, भोसरीचे महेश लांडगे, हडपसरचे योगेश टिळेकर, रामशेठ गावडे, बीएसएनएल सदस्य दत्तात्रय भालेराव व मतदारसंघातील लाखो नागरिक यावेळी उपस्थित राहणार आहेत.










