न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- राहत्या घरी फिर्यादी असताना (दि.०१/०८/२०२३) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास मोबाईलवरुन फोन करून आरोपी मोबाईल धारक इसमाने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलमध्ये Play Store मधुन Rust Desk हे अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांच्या एच.एस.बी.सी. बँकेच्या क्रेडीट कार्डचा गैरवापर करुन फिर्यादी यांच्या परस्पर त्यांच्या क्रेडीट कार्डवरुन दहा हजार रुपये ऑनलाईन ट्रॅझेक्शन करुन फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी सचिन भानुदास गोडांबे यांनी आरोपी मोबाईल नंबर ८५१५०७८७९८ धारक इसम दिपक शर्मा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात ७३९/२०२३भा.दं.वि कलम ४२०, ४०६, महिती तंत्रज्ञान अधिनिमय ६६ सी, ६६ डी प्रमाणे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वपोनि जाधव तपास करीत आहेत.









![[भोसरी]:- क्रेडीट कार्डचा गैरवापर करीत एकाची ऑनलाईन आर्थिक फसवणुक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-1-6-90x60.jpeg)
![[भोसरी]:- क्रेडीट कार्डचा गैरवापर करीत एकाची ऑनलाईन आर्थिक फसवणुक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-2-5-90x60.jpeg)




