न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई हायवेवर पवळे पुलासमोरील रस्त्याच्या आडोशाला (दि. ११) रोजी रात्री ७.५० वाजेच्या सुमारास आरोपी हा थांबला होता. त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याजवळ १,१५,२५० रुपये किंमतीचा माल ज्यामध्ये १,०३,२५० रुपये किंमतीचा ०४ किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व १२,००० रुपये किमतीचा मोबाईल हा ऐवज होता. त्याच्याकडे मिळुन आलेला गांजा हा अंमली पदार्थ त्याने आरोपी क्र २ याच्याकडुन आणल्याचे तपासात सांगितले.
१) अंकुश कृष्णा साळवे (वय ६० वर्षे रा शिवाजीनगर, देहूरोड), पाहिजे आरोपी २) विकास घोडके (संपुर्ण नाव माहिती नाही, रा. ताडीवाला रोड, कैंप, पुणे) यापैकी अंकुश याला पोलिसांनी अटक केली आहे.
दोघांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात ५४८/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २० (ब) (आय आय ) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि भोसले पुढील तपास करीत आहेत.










![[निगडी]:- पवळे उड्डाणपुलासमोर लाखाचा गांजा जवळ बाळगणाऱ्या इसमाला अटक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-11-90x60.jpeg)
![[निगडी]:- पवळे उड्डाणपुलासमोर लाखाचा गांजा जवळ बाळगणाऱ्या इसमाला अटक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-17-90x60.jpeg)



