- सिनेस्टाईलपणे पाठलाग करणारी टोळी अखेर जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- काळेवाडीतील एम्पायर इस्टेटकडे जाणाऱ्या ब्रिजवर आणि १६ नंबर ते काळेवाडी फाटयावर (दि. ८) रोजी दुपारी ३.२० ते ३.३० च्या दरम्यान फिर्यादी व त्यांचे जोडीदार हे हिरो स्प्लेण्डर (एमएच१४एचएस९९४४) दुचाकीवरून ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेली सॅक घेवुन जात होते.
त्या दरम्यान काळ्या रंगाच्या स्प्लेण्डरवरुन आलेल्या दोन अनोळखी चोरटयांनी प्रथम काळेवाडी फाटयाजवळ फिर्यादीला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एम्पायर इस्टेट ब्रिजवर येवुन फिर्यादीच्या दुचाकीला, त्यांची दुचाकी आडवी मारुन फिर्यादीच्या ताब्यातील सोन्याचे दागीने असलेली सॅक जबरीने ओढुन चोरण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी मुकेशकुमार जिवाराम लोहार यांनी निष्पन्न आरोपी १) अभिराज जोबुराम कोरी (वय २८ वर्षे रा. हरगुडे वस्ती, चिखली), २) मुस्तफा ऊर्फ गणेश आस्लम शेख (वय २३ वर्षे रा. हरगुडे वस्ती, चिखली), ३) किशोर सुरेश भिसे (वय २२ वर्षे रा. घरकुल चिखली), ४) शमशाद रज्जबअली शाह (वय २० वर्षे रा. हरगुडे वस्ती, चिखली), ५) सुनिल रामकृष्ण वाडेकर (वय ४५ वर्षे रा. आळंदी) यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाकड पोलीस ठाण्यात ९०१/२०२३ भा.दं.वि. कलम ३९३.३४१.३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सपोनि पाटील पुढील तपास करीत आहे.








![[काळेवाडी] सोन्याचे दागिने असलेली सॅक लुटण्याचा डाव फसला..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/64ff8be5bbb22-90x60.jpg)
![[काळेवाडी] सोन्याचे दागिने असलेली सॅक लुटण्याचा डाव फसला..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-11-90x60.jpeg)



