न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- मागील भांडणांचा राग मनात धरुन फिर्यादीच्या मुलीला त्यांची भाची आरोपी क्रं १ हिने घाण घाण शिवीगाळ केली. भाचा आरोपी क्र. २ याने हातात लाकडी दांडका घेऊन फिर्यादीच्या मुलीच्या अंगावर मारण्यासाठी धावून फिर्यादीला खाली पाडुन दांडक्याने डाव्या गुडघ्यास मारुन जखमी केले. पाठीवर दांडक्याने मारल्याने मुका मार लागला.
तेव्हा फिर्यादीचा मुलगा हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्याला आरोपींनी मिळुन लाथाबुक्याने मारहाण केली. पाठीवर मारल्याने मुका मार लागुन तो जखमी झाला. तसेच फिर्यादीची पत्नी हीला बहीण आरोपी क्र. ४ व भाची आरोपी क्र १ हीने लाथाबुक्याने मारहाण केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. ११) रोजी अंदाजे रात्री ८.३० च्या सुमारास राहत्या घरासमोर आंबेडकर नगर, कॅन्टोमेंन्ट हॉस्पीटल मागे, देहूरोड येथे घडला.
फिर्यादी बाळासाहेब जयाराम धुतडमल यांनी आरोपी १) महिला, २) विजय रामदास नवगिरे, ३) वैभव राज चव्हाण, ४) महिला आरोपी (सर्व रा. आंबेडकर नगर, कॅन्टोमेंन्ट हॉस्पीटल मागे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलीस ठाण्यात ५११/२०२३ भा.दं.वि कलम ३२४, ३२३, ५०४,३४ अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा ८११ चव्हाण पुढील तपास करीत आहेत.