न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल) :- इंडिएन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. सुहास माटे यांची तर सचिवपदी डॉ. सुधीर भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. इंडिएन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
उपाध्यक्षपदी डॉ. संजीव दाते व डॉ. विजय सातव यांची तर डॉ. ललित धोका यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. मे महिन्यात नेत्र व कान नाक घसा या विषयावर कार्यशाळा व पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती मावळते अध्यक्ष डॉ. संजय देवधर यांनी दिली.
इंडिएन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखा गेली पाच वर्षांपासून कार्यरत आहे. 582 डॉक्टर सदस्य असून समाजाच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर आहे. अशी माहिती विश्वस्त डॉ. दिलीप कामत यांनी दिली.










