न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल) :- पार्थ पवार दापोडीतील एका वादग्रस्त ख्रिश्चन धर्मगुरुकडे गेल्यामुळे ट्रोल झाले. त्यावर पार्थ पवार म्हणाले की, दररोज गाठीभेटी, प्रचार दाैरे सुरु असताना कार्यकर्त्यांच्या भावना, त्याचा मान राखून दापोडीतील चर्चमध्ये गेलो.
त्यावरुन मी ट्रोल झालो. मात्र, स्थानिक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना असतात त्यामुळं जावं लागतं. चर्चमधल्या धर्मगुरुबद्दल काही आक्षेप असतील, ते मला अजिबात माहीत नाहीत.
पहिल्या भाषणाबद्दलही पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. पहिलं भाषण जरा नीट झालं नाही. पहिल्या प्रयत्नात असं होतंच. इंग्रजी माध्यमातून शिकलो म्हणून मराठी येत नाही, असं नाही. सराव झाला की मराठी येतं. कितीतरी लोकांना भाषेचं ज्ञान नसतं, पण ते चांगलं काम करुन दाखवतात, असंही पार्थ पवार म्हणाले.










