न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी (गवई गट) (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांचा विविध मार्गाने प्रचार सुरु आहे.
त्यांच्या प्रचारार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवार (दि. ७) रोजी काळेवाडी परिसर व आझाद चौक, ज्योतीबानगर येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी पद्यात्रेद्वारे मतदारांशी संपर्क साधला व पार्थ पवार यांना निवडून देण्याचे नागरिकांना आवाहन केले.
याप्रसंगी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, नाना काटे, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर, सज्जी वर्की, हनुमंत गावडे, युवा नेते सागर तापकीर, कुणाल थोपटे व परिसरातील हजारो नागरिक, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.










