न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय व्हॉंलीबॉल स्पर्धेचे अयोजन ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन (दि. १२) रोजी आमदार उमा खापरे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, स्पर्धाप्रमुख बन्सी आटवे आदि उपस्थित होते.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धा १४ वर्षे १७ वर्ष १९ वर्ष मुलामुलींच्या वयोगटात होणार आहेत. (दि. १३ ते २१) या काळात या स्पर्धेचे आयोजन डॉ. हेगडेवार क्रीडा संकुल मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी महानगरपालिका प्र. क्रीडा अधिकारी अनिता केदारी व विवेक भागवत बुद्धिबळ संघटना अध्यक्ष पिंपरी चिंचवड, विकास देशपांडे, सदाशिव गोडसे, पवन राठी, गोरक्ष तिकोने क्रीडा पर्यवेक्षक स्पर्धा प्रमुख यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे सूत्रसंचालन दीपक जगताप यांनी केले व आभार दादाभाऊ होलगुंडे यांनी मानले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र भोसरी येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन (दि. १२) रोजी संपन्न झाले. यावेळी पै. महादेव लांडगे, पै. बाळासो लांडगे, पै. बाबा लांडगे, पै. शामराव लांडगे, पै. कालिदास लांडगे, पै. संतोष माचुत्रे सचिव पिं. चि. कुस्तीगीर संघ, अजय लांडगे मुंबई महापौर केसरी, युवा महाराष्ट्र केसरी पै. किशोर नखाते, क्रीडा पर्यवेक्षक व स्पर्धा प्रमुख आत्माराम महाकाळ, शारीरिक शिक्षण महासंघ अध्यक्ष मुकेश पवार आदि उपस्थित होते.


















