- पालिकेत होणार वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत १०० वाहन चालक पीएमपीकडे वर्ग झाल्याने पालिकेला वाहन चालकांची कमतरता जाणवत आहे. पहिल्या टप्प्यात ६० कंत्राटी वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती महापालिका प्रशासन करणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे (मेस्को) वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागात पीएमपीचे १०० वाहन चालक कार्यरत होते. मात्र, प्रशासनाने आपल्या सर्व वाहन चालकांना पीएमपीमध्ये हजर होण्याच्या सूचना दिल्याने हे सर्व चालक पीएमपीमध्ये हजर झाले आहेत. महापालिका प्रशासनानेही हे सर्व चालक पीएमपीकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या रूग्णवाहिका, अग्निशमन, अतिक्रमण यासह विविध विभागांना वाहन चालकांची कमतरता जाणवत आहे.
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ हे राज्य सरकारच्या पॅनेलवरील संस्था आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया न राबवता थेट पध्दतीने कंत्राटी वाहन चालकांची भरती केली जाणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेले १०० वाहन चालक पीएमपीकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे सध्यस्थितीत आवश्यक असलेल्या विभागात ६० वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग…















