न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा येथे कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर कारचालक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
अर्जुन शेळके आणि भालचंद्र अहिरकर असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही निगडीतील यमुनानगर येथील रहिवाशी आहेत. ही घटना आज बुधवारी (दि. १३) रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.
दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाल्याने यात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. मृत्यू झालेले दोघेही दुचाकीवरून तळेगावच्या दिशेने जात होते. या प्रकरणी तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.










![[सोमाटणे]:- कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात निगडीतील दोघे ठार...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/MG_9910-90x60.jpg)
![[सोमाटणे]:- कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात निगडीतील दोघे ठार...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/crime-7_202007450201-90x60.jpg)





