- साडेआठ महिन्यात तब्बल २४८ आरोपींवर पोलिसांनी लावला ‘मोका’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर सन २०२३ पासून आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ३० संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण २४८ आरोपींवर पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. त्या अनुषंगाने संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी “मोका पॅटर्न” अंतर्गत थेरगावातील विकी मल टोळीवर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे.
वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ६६७/२०२३ भादवि. ३०८, ३६४, ३९४, ३८४, ३२५, ३२३, ५०६, ३४ या गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी (१) विकी रामप्रसाद मल-टोळी प्रमुख (वय ४२ वर्षे, रा. कैलासनगर, थेरगाव) (२) प्रसाद रोहीदास भापकर (वय २४ वर्षे, रा. मोहन नखाते चाळ, शिवशक्ती कॉलनी, रहाटणी), (३) प्रतीक अंतवण पवार (रा. थेरगाव) यांच्याविरुध्द वाकड, पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, पळवून नेणे, डांबून ठेवणे, खंडणी मागणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, वाहनांची तोडफोड करणे, तसेच वाहनांची जाळपोळ करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे, असे विकी मल टोळीवर एकूण १५ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.
टोळीमधील सर्व आरोपी यानी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला होता. या प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून नमूद गुन्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (परि-०२) काकासाहेब डोळे, सपोआ बाळासाहेब कोपनर (गुन्हे-१), सपोआ विशाल हिरे (वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पी.सी.बी (गुन्हे शाखा), वपोनि गणेश लाकड पो.स्टे), तसेच अंमलदार पो हवा सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी, पो.सी.बी. गुन्हे शाखा) सपोफो मुहा पाटोळे, पो.ना. शिमीन चांदेकर (वाकड पो.स्टे.) यांच्या पथकाने केली आहे.