- वाहतूक शाखेकडून रस्ता बंद; हे आहेत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- निगडीतील भक्ती शक्ती चौक येथे हिंदू साम्राज्य वर्ष/शिव राज्याभिषेक वर्षे, अखिल पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समिती व पिंपरी चिंचवड ढोल ताशा महासंघ यांचा शनिवारी (दि. १६) रोजी कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी दहा हजार ते वीस हजार जनसमुदाय कार्यक्रमास असणार आहे. भक्ती शक्ती चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीकांची वर्दळ होवुन वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान निगडी वाहतूक विभागाकडून (दि. १६) रोजी दुपारी २.०० ते कार्यक्रम संपेपर्यंत अथवा वाहतुक सुरळित होईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, इ. वाहने वगळुन सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वाहतुक शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.
तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :-
देहुरोडकडुन येणारी वाहतूक ही भक्ती शक्ती चौकामध्ये न येता ती उड्डाणपुलावरुन ग्रेडसेप्रेटरमधुन जावून रुद्रा पार्किंगच्या समोरील आऊटमधुन बाहेर पडुन इच्छितस्थळी जाईल. त्रिवेणीनगर चौकाकडुन येणारी वाहतूक ही भक्ती शक्ती ब्रिजवर न चढता ती डाव्या बाजूच्या टिळक चौक तसेच भक्ती शक्ती भूयारी पुलाखालुन अप्पूघर मार्गे इच्छित स्थळी जाईल. अप्पूघर / रावेतकडुन येणारी वाहतूक व ट्रान्सपोर्टनगर मधुन येणारी वाहतूक ही भक्ती शक्ती ब्रिजवर न चढ़ता ती भक्ती शक्ती भुयारी पुलाच्या खालून अंकुश चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल. संभाजी चौकाकडुन भक्ती शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक ही भक्ती शक्ती ब्रिजवर न चढता ती भेळ चौक येथे लोकमान्य हॉस्पीटलमार्गे टिळक चौकातून इच्छित स्थळी जातील. काचघर चौकाकडुन भक्ती शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक ही भक्ती शक्ती ब्रिजवर न चढता ती काचघर चौकातून उजव्याबाजूने वळून गांधी हॉस्पीटलमार्ग टिळक चौक येथुन इच्छितस्थळी जातील. टिळक चौकाकडून भक्ती शक्ती चौकाकडे येणारी वाहतूक ही भक्ती शक्ती चौकाकडे न येता ती एस.बी.आय समोरील इनमधुन ग्रेडसेपरेटर मार्गे भक्ती शक्ती उड्डाणपुलावरुन देहुरोड मार्गे इच्छितस्थळी जाईल.


















