- असे आहेत पर्यायी मार्ग आणि नो पार्किंग झोन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- सांगवीतील पीडब्ल्यूडी ग्राऊंडवर रवि किसनराव यादव यांनी निर्माल सेवा ट्रस्ट संस्थेच्या वतीने (दि. १५ ते दि. २१) रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० च्या दरम्यान श्री. शिव महापुराण कथा या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी अति महत्वाच्या व्यक्ती तसेच लाखो भाविक खाजगी वाहनाने येणार आहेत. त्यामुळे परीसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान सांगवी वाहतूक विभागाकडून (दि. १५ ते दि. २१) रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० च्या दरम्यान अथवा वाहतुक सुरळित होईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, इ. वाहने वगळुन सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग आणि निर्बंध…
जुनी सांगवी पाण्याची टाकी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) ते साई चौक नवी सांगवी दरम्यान येण्या-जाण्याच्या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळुन सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गे :- १) जुनी सांगवी पाण्याची टाकी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) कडून बँक ऑफ महाराष्ट्र चौक, माकन चौक, जुनी सांगवी किंवा सांगवी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. २) साई चौक नवी सांगवीकडुन महेश्वरी चौक किंवा फेमस चौक, नवी सांगवी मार्गे इच्छित स्थळी जातील.
साई चौक, नवी सांगवी ते जुनी सांगवी पाण्याची टाकी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) रोडच्या दोन्ही बाजूस आणि जुनी सांगवी पाण्याची टाकी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) ते माकन चौक जुनी सांगवी दरम्यान रोडच्या दोन्ही बाजूस तसेच माकन चौक, जुनी सांगवी ते माहेश्वरी चौक नवी सांगवी दरम्यान रोडच्या दोन्ही बाजूस आणि माहेश्वरी चौक-नवी सांगवी ते साई चौक नवी सांगवी दरम्यान रोडच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.















