- एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- भाजीपाल्याची गाडी लावायची नाही, या कारणावरून पिंपरीत भाजी विक्रेत्यांच्या दोन गटात वादावादी आणि त्यावरून हाणामारी झाली. दोघांकडून एकमेकांवर परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.
टेम्पो लावुन भाजी विक्री करीत असताना दोन मोटार सायकलवर फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचे आरोपी क्र. १ ते ५ तीथे आले. तेव्हा फिर्यादीने भाजीपाल्याचा टेम्पो लावल्याचे कारणावरुन आरोपी क्र. २ याने फिर्यादीला कमरेला पाठीमागुन पकडुन ठेवले. तेवढ्यात, आरोपी क्र.२ याने फिर्यादीस ‘हा खुप माजलाय, आज याला सोडायचे नाही’, असे म्हणुन शिविगाळ करुन लाकडी बांबुने फिर्यादीच्या डाव्या हातावर ४ ते ५ वेळा मारुन फिर्यादीचा हात फ्रॅक्चर करुन त्यांना गंभीर जखमी केले.
तसेच आरोपी क्र. ३ याने लोखंडी वजनाच्या मापाने फिर्यादीच्या पाठीवर, खांदयावर मारहाण केली. तसेच आरोपी क्र. ३ ते ५ यांनी त्यांच्याजवळ असलेल्या लाकडी बांबुने फिर्यादीच्या कमरेवर, मांडीवर, पाठीवर मारहाण केली व त्यांच्या हातात असलेली लाकडी दांडके हवेत फिरवुन परिसरात दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. १२) रोजी दुपारी १.५० वा. च्या सुमारास उद्यमनगर, पिंपरी येथे सार्वजनिक रोडवर घडली.
फिर्यादी सईद मुस्तफा पठाण यांनी आरोपी १) सिकंदर ऊर्फ प्रमोद गिरी, २) सुनिल गिरी, ३) सागर शहा, ४) अमित गिरी, ५) अनिल गिरी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ९२७/२०२३ भा.द.वि. कलम ३२६,५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५, क्रि. लॉ अमेंडमेन्ट कायदा कलम ३ व ७ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी क्र. १ ते ४ अटक आहेत. पोउपनि चाटे पुढील तपास करीत आहेत.
याउलट परस्पर दिलेल्या फिर्यादीत एरीयात भाजीपाल्याची गाडी लावायची नाही? या कारणावरून फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ यांना आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने, बेकायदेशीर जमाव जमवून संगणमताने लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने व दगडाने मारून गंभीर जखमी केले. त्यांना वाईट शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या हातातील लाकडी दांडके हवेत फिरवून मोठमोठ्याने ओरडून परिसरात दहशत माजविली. त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली व रस्त्यावरील लोक घाबरून पळून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १२) रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास जय श्री दुर्गा भाजी फ्रुट सेंटर दुकान, अमिर चिकन सेंटर शेजारी, अॅन्थनी गार्डनसमोर, वल्लभनगर, पिंपरी येथे घडला होता. याप्रकरणी फिर्यादी अनिल कैलास गिरी यांनी आरोपी १) समीर मुस्तापा पठाण, २) नुर मोहम्मद बादशाहा शेख, ३) इम्रान चांदशेख, ४) मोईन मुक्तार पठाण, ५) नझीर बादशाहा शेख, ६) सईद मुक्तापा पठाण, ७) आमजद पठाण ८) शकील मतेखान, ९) सोहेल मतेखान (सर्वांचे वय अंदाजे २२ ते ३० वर्षे, सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ९२६/२०२३ भा.द.वि. कलम ३०७,३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४, १४३, १४७, १४९, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट ३ महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५. प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पैकी आरोपी क्र. १ ते ६ जणांना अटक केली आहे. सपोनि कैलासे पुढील तपास करीत आहेत.











![[पिंपरी]:- भाजीपाल्याच्या गाडीवरून दोन गटात तुंबळ हाणामारी..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/mumbai_traffic_update_1670823769571-90x60.jpeg)
![[पिंपरी]:- भाजीपाल्याच्या गाडीवरून दोन गटात तुंबळ हाणामारी..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/morph-90x60.jpg)





