- न घेतलेल्या कर्जासाठी फोनद्वारे महिलेची बदनामी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल नंबरवरून फेक कॉल्स व मेसेजेसव्दारे फिर्यादीने कधीही लोन काढून न घेतलेले पैसे परत देण्यासाठी त्यांना आरोपींनी धमकावले.
फिर्यादीच्या चेह-याच्या फोटोचा वापर करुन फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा पध्दतीने मॉर्फिंग करून फिर्यादीचे न्यूड केलेले फोटो हे फिर्यादीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठविले, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २२/०७/२०२३ ते दि. १२/९/२०२३ पर्यंत) चिंचवडगावात घडला.
महिला फिर्यादीने आरोपी १) ०९९६९५४४३९६, २) ८८०१६१७६१०३८२, ३) ८८०१९३९८३०४८९, ४)८८०१७०८-७८७७१३ वरील मोबाईल नंबरधारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ४४९/२०२३ भारतीय दंडविधान कलम ३५४ (ड), माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी), ६७ (ओ) नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोनि जाधव पुढील तपास करीत आहेत.