- फरशीचा तुकडा एकाच्या डोळ्यावर मारून केले गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- मुलाला रस्त्यात आडवून ‘तु माझी फोर व्हिलर गाडी अंगणवाडीसमोर पार्क करून देत नाही’ असे म्हणून त्याला आरोपीने शिवीगाळ केली. फिर्यादीचा भाऊ आरोपीला त्याला समजावण्यासाठी गेला असता त्यालासुध्दा शिवीगाळ करून आरोपींनी हाताने मारहाण केली. खाली पडलेला फरशीचा तुकडा उचलून आरोपीने फिर्यादीच्या मुलाच्या उजव्या डोळयाखाली मारून त्याला जखमी केले. नंतर आरोपी क्र. १ व २ यांनी फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करून आरोपी क्र.२ याने लाकडी काठी त्याच्या दोन्ही हातावर, पाठीवर मारून ढकलून दिले. त्यामुळे फिर्यादीचा मुलगा दगडावर पडला. त्याच्या डोक्याला पाठीमागून जखम झाली आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
ही घटना (दि. १२) रोजी दुपारी १.३० च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर, साठेनगर, च-होली बु. येथे घडली. फिर्यादी राजकुमार हरिचंद्र मगर यांनी आरोपी १) प्रविण अविनाश रसाळ, २) अशिष अविनाश रसाळ, शामल अविनाश रसाळ यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
दिघी पोलीस ठाण्यात ४१८/२०२३ भा. द. वि कलम ३२४, ३३८, ३४१, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोफी जाधव तपास करीत आहेत.










![[चऱ्होली]:-'तु माझी फोर व्हिलर गाडी अंगणवाडीसमोर पार्क करून देत नाही'..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/morph-90x60.jpg)
![[चऱ्होली]:-'तु माझी फोर व्हिलर गाडी अंगणवाडीसमोर पार्क करून देत नाही'..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/13nclr17_201910310563-90x60.jpg)



