न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- पिपळे गुरव येथील सानवी पान शॉपसमोरील रस्त्यावर आरोपी नं ३ हा आरोपी नं १ व २ यांना ४०,००० रुपये कीमतीच्या हीरो होन्डा दुचाकीवरुन घेवुन संशयितरीत्या फिरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. (दि. १३) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपी नं १ याने आपल्या काब्ज्यात देशी बनावटीचे एक पिस्टल ३०,००० रुपये कीमतीचे व एक जिवंत पितळी राऊंड १००० रुपयांचा व आरोपी नं. २ याने ०१ जिवंत पितळी राऊंड १००० रुपयांचा ऐवज बाळगला होता.
१) विघ्नेश गुणशिलंन रंगम (वय २४ वर्षे रा. कृष्णाई निवास गंगोजिनगर लेन नं २ पिंपळे गुरव), २) अक्षय राजेश बुडे (वय २५ रा. पंचशिल चौक मुंजाबा वस्ती धानोरी), ३) नागेश मल्लप्पा कांबळे (रा. मोजे शाळेचे समोर गुंजाबा वस्ती धानोरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात ४९३/२०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ सह मो.वा.का. क. १२८/१७७३(१)१८१ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि भालेराव पुढील तपास करीत आहेत.











![[पिपळे गुरव]:- संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणांकडून दोन पिस्टल आणि राऊंड जप्त...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-1-9-90x60.jpeg)
![[पिपळे गुरव]:- संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणांकडून दोन पिस्टल आणि राऊंड जप्त...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-2-8-90x60.jpeg)





