न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- मावळ तालुक्यातील शिरगाव येथे (दि. १३) रोजी सकाळी ११.११ च्या सुमारास महीला आरोपी यांनी त्यांच्या बरोबर ५० ते ६० लोकांचा बेकायदेशीरपणे फिर्यादीच्या जमीन गट नंबर १९७ मध्ये जमाव जमवला.
फिर्यादीच्या जागेत येवुन सदरची जागा आमची आहे, असे म्हणुन फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुबीयांच्या अंगावर येवुन शिवीगाळ, दमदाटी करुन फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी लिंबाजी रामभाऊ गायकवाड यांनी महिला आरोपीसह ५० ते ६० लोकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलीस ठाण्यात २७०/२०२३. भादवी क १४३.१४७.१४९.५०४.५०६ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोना परदेशी तपास करीत आहेत.










![[शिरगाव]:- शेतकऱ्याच्या जागेत जमाव जमवून जिवे मारण्याची धमकी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/13nclr17_201910310563-90x60.jpg)
![[शिरगाव]:- शेतकऱ्याच्या जागेत जमाव जमवून जिवे मारण्याची धमकी...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-3-8-90x60.jpeg)



