न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- पिपरी चिंचवड महानगरपालिकेचे तालेरा हॉस्पिटल आणि महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या विशेष पुढाकारातून वेताळनगर व मोरयानगर, चिंचवड या ठिकाणी गुरुवारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये लहान बालके, गरोदर महिला तसेच सर्व महिला-पुरुष यांचे बीपी शुगर रक्त तपासण्या मोफत औषध उपचार करण्यात आले. तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण मोहिमे अंतर्गत रुग्णांना औषधे व सकस आहार किट देण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन पिपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय अधिक्षक डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. अभयचंद्र दादेवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर संघटक संतोष सौंदणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी यूनिसफचे सदस्य उपस्थित होते. डॉ. संगिता तिरूमणी, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, डॉ. असावरी ढवळे नोडल ऑफिसर तालेरा रुग्णालय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. आसावरी ढवळे यांनी आरोग्य विषयी समुपदेशन केले व महिला, लहान बालक आणि जेष्ठ नागरिक यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सकाळी ९ ते ४.३० या वेळेत आयोजन केले जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वेताळनगर शाखेचे उपविभाग प्रमुख कुदरत खान, शाखाप्रमुख मजिद शेख, कलावती नाटेकर, किशोर सातपुते, आश्विन मायनाळे राजू माशाळकर, महेश शेतसंधी, रमेश शेंडगे, खायुम पठाण, संतोष शिंदे, संतोष कांबळे अस्लम शेख, सूरज भराटे, अक्षय आरकसूळ, ओम परदेशी, डॉ. अभिजीत सांगडे, डॉ. सुपेकर, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, डॉ. सत्यजित शिराळे, डॉ. अर्पिता, डॉ. अंजली ढोणे, प्रियंका सर्वज्ञ पाटील तसेच तालेरा रुग्णालयाचे कुटुंब कल्याण विभागाचे ए.एन.एम. आशा, महिला आरोग्य समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी आभार मानले.















