न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- जागतिक ‘आजी-आजोबा दिना’च्या निमित्ताने ‘न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी फुलांची उधळण करत यांचे स्वागत करून आजी-आजोबांचे औक्षण केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आजी – आजोबाच्या मनोरंजन करण्यासाठी संगीत खुर्ची कार्यक्रम ठेवला होता. तसेच इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी या मुलांनी नृत्य सादर केले तसेच एल के जीचा विद्यार्थी देबाशी हलदार , युकेजी चा विद्यार्थी स्वरा घाटके यांनी आजी – आजोबांची बद्धल भाषण केले. आजी-आजोबांनी आपल्या नातवाच्या नात्याला उजाळा दिला. अथर्वशीर्षपठण केले. विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांसह गणपती बनवण्याच्या कार्यशाळेत सहभागही घेतला.
शिक्षकांनी खास आजी-आजोबा आणि मुलांसाठी हास्य क्लबचे आयोजन केले होते. सर्व आजी आजोबांना चहापानाचा आणि बिस्किटाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. शंभर आजी-आजोबांनी यानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन श्वेता भालेराव- गायकवाड यांनी केले.















