- चोराला केले पोलिसांसमोर हजर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- हिरो होंडा कंपनीची सीडी १०० (एमएच१०एम२७७७) ही गाडी फिर्यादीने लॉक करुन पार्क केली होती. दरम्यान आरोपी याने ती चोरुन नेली होती. सदरचा आरोपी इसम हा फिर्यादीची गाडी चोरुन फिरवत असताना घसरुन रस्त्यावर पडला. त्यावेळी त्याचाजवळ फिर्यादी यांची गाडी मिळुन आली. त्याला घेवुन फिर्यादी यांनी आरोपीला पोलीसांच्या ताब्यात दिले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १४) रोजी ८.०० ते सायं. ७.१५ च्या सुमारास दत्तनगर, टेकडी, दत्तनगर दिघी येथे घडली. फिर्यादी आप्पासाहेब माधव महाडीक यांनी आरोपी कृष्णा दत्तात्रय म्हेत्रे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ४२१ / २०२३, भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे पोहवा जाधव पुढील तपास करीत आहेत.