न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- देशी बनावटीचे पिस्टल कोणताही कायदेशीर परवाना नसताना आरोपीने कब्ज्यात अवैधरित्या बाळगले. पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेने कारवाई करीत आरोपीला (दि. १४) रोजी दुपारी २.३० वा. च्या सुमारास साई मंदीरासमोर, जगताप डेअरी चौकात ब्रिजचे खाली, रहाटणी येथून ताब्यात घेतले.
आरोपीकडून ५०,००० रुपये किमतीचे पिस्टल जप्त केले आहे. वाकड पोलीस ठाण्यात ९०७/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्लम अहमद शेख (वय – ३२ वर्षे रा. १६ नंबर, पवार गल्ली नं. ०५, थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. सपोनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.








![[रहाटणी]:- तरूणाकडे आढळले देशी बनावटीचे पिस्टल...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/images-13-90x60.jpeg)
![[रहाटणी]:- तरूणाकडे आढळले देशी बनावटीचे पिस्टल...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/Girder-Erection-90x60.jpg)



