न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलेला दोघा आरोपींनी पैशांचे अमिष दाखवले. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपींना ताब्यात घेत १४,५४० रुपये किमतीचा मुददेमाल आरोपींकडून जप्त केला आहे.
निगडी पोलीस ठाण्यात ५५६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७० (२) ३४, सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कलम ४,५ अधिनियम १९५६ नुसार आरोपी १) आवधुत चंद्रसेन लवटे (एजंट), २) महीला आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोनि कदम पुढील तपास करीत आहेत.