न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- अनोळखी व्यक्तीने ‘तो हंस राज उर्फ अकुल मिना’ असल्याचे महिला फिर्यादीला सांगितले. शादी डॉट कॉम अॅपच्या माध्यमातुन मोबाईल क्रमांकावरून फिर्यादीसोबत संपर्क केला. फिर्यादीला लग्नाचे अमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. नवीन घर खरेदी करण्यासाठी, बँकेचे होम लोन, पर्सनल लोन, फायनान्स काढण्यास लावले. तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविन्यास सांगुन शेअर मार्केटमध्ये झालेल्या प्रॉफीटमधुन पुर्वीचे लोन संपवायचे व चालू होम लोन व पर्सनल लोन याचे हप्ते संपवायचे आहेत, असे सांगुन फिर्यादीची एकुण २०,८०,००० रूपयांची फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत म्हटल आहे.
हा प्रकार एप्रिल २०२३ ते १५/०९/२०२३ रोजीच्या दरम्यान शिंदेवस्ती, मारूंजीगाव येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी अखिलेश गुर्जर याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
त्यावरून हिंजवडी पोलिसांनी १०७५/२०२३ भा.द.वि. कलम ४०६,४१७,४१९, ४२० प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि खडके पुढील तपास करीत आहेत.








![[मारुंजी]:- शादी डॉट कॉमच्या माध्यमातून महिलेला जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/download-1-11-90x60.jpeg)
![[मारुंजी]:- शादी डॉट कॉमच्या माध्यमातून महिलेला जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2023/09/gold2-20230528165501-90x60.jpg)



