न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- रुपीनगर तळवडे परिसरातील गणपती विसर्जन सोहळा अतिशय जल्लोषात व आनंदात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित सोहळ्यात सहभागी पोलिस बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष दत्ता देवतरासे, नितीन चव्हाण, प्रभाग अध्यक्ष सूरज जाधव, उपविभाग अध्यक्ष सचिन मिरपागर, विद्यार्थी सेना ज्ञानेश्वर निकम, महिला सेना श्रद्धा देशमुख, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, रेणुका मानकरी आदी उपस्थित होते.












