न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२३) :- हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) निमित्त जमाते लतीफिया मशिद, मिलींदनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथील पीएमपीएल मैदानापर्यंत उद्या (दि. ३०) रोजी दुपारी ३.०० वाजता मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या मिरवणूकीत शहरातील चिखली, नेहरूनगर, वाकड, भोसरी, निगडी, कासारवाडी, काळेवाडी येथून २० मंडळे सहभागी होणार असून ७ ते ८ हजार मुस्लीम बांधव पायी येवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमणार आहेत. या ठिकाणी मिरवणूक संपल्यानंतर पीएमपीएल मैदान येथील सभेच्या ठिकाणी प्रवचन ऐकण्यासाठी मुस्लीम बांधव मोठया प्रमाणात जमा होणार असल्याने मिरवणुक व सभेच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
पिंपरी वाहतूक विभागाच्या हद्दीत हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमीत्त निघणाऱ्या मिरवणुकांच्या अनुषंगाने (दि. ३०) रोजी दुपारी २.०० ते ००/०० वा. दरम्यान आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक वळविण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले आहे.
तात्पुरते बदल पुढीलप्रमाणे….













