न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२३) :- पाणीपुरवठा विभागाच्या से.क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा गुरुवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२३) रोजी सकाळचा पाणीपुरवठा नियमीत वेळेनुसार होणार आहे. तर, संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. ०६/१०/२०२३) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे.













