न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- मुलींच्या वसतीगृहाच्या छताचा भाग कोसळून एक विद्यार्थिनी जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ५) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास वाकड येथे घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरीनगर, वाकड येथे आदिवासी मुलींचे वसतीगृह आहे. या वसतीगृहातील चौथ्या मजल्यावरील खोली क्रमांक २७ मधील छताच्या थोडासा भाग (ढपली) पडला. यावेळी तिथे उभ्या असलेल्या अनिता गेणू पथवे हिच्या डोक्यावर तो भाग कोसळला. त्यामुळे तिच्या कपाळाला दोन टाके पडले.
याबाबत अग्निशामक दलास सायंकाळी ६.१६ वाजताच्या सुमारास माहिती मिळाली असता रहाटणी अग्निशामक उपकेंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाला. उपचारानंतर अनिता या आपल्या बहिणीकडे भोसरी येथे गेल्या. आदिवासी मुलींच्या वसतीगृहाची छताचा कोसळल्याने तिथे भाग राहत असलेल्या अन्य मुली देखील भयभीत झाल्या असून किमान वसतीगृहाची व्यवस्थित डागडुगी व देखरेख होणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.


















