- भाजपा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२३) :- कासारवाडी येथील मनपाच्या जलतरण तलावामध्ये नुकतीच गॅस गळतीमुळे मोठी घटना होता होता टळली. यामध्ये तेथील जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे होणारे मोठे नुकसान टळले आहे. अनेकांचे जीवन बचावले आहे. यासाठी त्या प्रत्येक जीव रक्षकांचा मनपाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात यावा.
तसेच पुन्हा अशा प्रकारची घटना होणार नाही, या दृष्टीने पिंपरी चिंचवड मधील सर्व जलतरण तलावांचे संपूर्ण ऑडिट करावे व अशी प्रकारची घटना पुन्हा होणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी एक विशेष समिती स्थापन करून या जलतरण तलावांची तज्ञ व्यक्तींकडून तपासणी व्हावी, अशी मागणी भाजपा पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
दरम्यान वाय सी एम हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथे भरती करण्यात आलेल्या जीवरक्षक व नागरिकांची भाजपचे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, सदाशिव खाडे, अमित गोरखे, सुजाता पलांडे, प्रतिभा जवळकर यांनी प्रत्यक्ष भेटून विचारपूस केली आहे.