- उपचारादरम्यान डॉक्टरकडून रिपोर्ट बदलून मालकाला मदत..
- चिखली पवार वस्तीतील श्री. मेहर अॅटोपार्ट इंडस्ट्रीजमधील घटना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- प्रेस मशीन ऑपरेटींगचे कोणतेही ज्ञान नसताना फिर्यादी कामगाराला सुरक्षाविषयक साधने व सुविधा न देता त्याला हायड्रोलिक मशीन चालविण्यास सांगितले. फिर्यादी मशीवर काम करीत असताना प्रेस मशीनची डाय फिर्यादीच्या उजव्या हातावर पडली. त्यामुळे उजव्या हातास गंभीर दुखापत होवुन फिर्यादीची तीन बोटे कापली गेली.
या अपघातास आरोपी क्र १ ते ३ हे कारणाभुत आहेत. फिर्यादी उपचार घेत असलेले विध्य ग्रेस हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी झालेल्या अपघाताबाबत स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती देणे आवश्यक असताना तसेच एमएलसी करणे गरजेचे असताना तसे न करता उपचाराची कागदपत्र बदलुन मालकास मदत केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि १२/०९/२०२३) रोजी रात्री १२.०० च्या सुमारास व पुर्वी मे. श्री. मेहर अॅटोपार्ट इंडस्ट्रीज, पवारवस्ती, चिखली येथे घडला.
फिर्यादी रविंद्र बाबुराम जयस्वाल (वय २० वर्षे, रा. पवार वस्ती, चिखली) याने आरोपी १) श्री. मेहर अॅटोपार्ट इंडस्ट्रीज, पवार वस्ती, चिखलीचे मालक दिपक तिवारी, २) मॅनेजर प्रेमसिंग ३) सुपरवायझर परवेज व ४) विध्य ग्रेस हॉस्पीटलचे डॉक्टर (पुर्ण नाव पत्ते माहित नाहीत) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ६६१/२०२३ भादवि कलम ३३८, २८७, १७६, १९३,३४ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि न्यामणे पुढील तपास करीत आहेत.















