न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- संभाव्य धोक्यापासुन सुरक्षित राहण्यास पुरेसा बंदोबस्त न करता आरोपीने भरलेल्या गॅस सिलेंडर टाकीद्वारे घरगुती मोकळ्या सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस भरला. ही बाब चाकण पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी (दि. १०) रोजी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास चाकण झिजाई मळा, आंबेठाण रोड, चौधरी ढाबा समोर आण्णा बुरडे यांचे मालकीचे माळा / दुकानामध्ये कारवाई केली.
आरोपी ज्ञानेश्वर ममता हुलवळे (वय ६८ वर्षे, रा. चाकण, ऐश्वर्या, आंगण, फलॅट नं. १६. आंबेठाण रोड, झिजाईमळा, ता.खेड, जि. पुणे) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात ७९८/२०२३ भा. द. वि. कलम ४२०, २८५, जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३, पुरवठा व वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३, ४, ५, ६, ७ ७ सह प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मडके पुढील तपास करीत आहेत.