न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- शेजारी राहणारी १६ वर्षे, ६ महिने, १३ दिवसांची मुलगी ही अल्पवयीन आहे, हे माहित असताना सुद्धा २३ वर्षीय आरोपीने तीला लग्नाचे अमीष दाखवले. तिला आरोपीने त्याच्या रहात्या घरात घेवुन जावुन तिच्या इच्छेविरुध्द वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. आरोपीने तीला १२ आठवडयाची गर्भवती केलं आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि २१/०५/२०२३) रोजी रात्री ११.०० वाजता चाकण येथे घडली. पिडीत मुलीच्या ४३ वर्षीय पित्याने आरोपी रंजित साथ करा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ७९७ / २०२३ भा. द. वि. कलम ३७६ (२) (एन), ५०६ बाल लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम ३, ४, ७, ८ अन्वये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला गजाआड केले आहे. पोउपनि डेरे पुढील तपास करीत आहे.