- पिंपळे सौदागरमध्ये आयुष्मान भव: आणि UHND CAMP आरोग्य शिबिर संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२३) :- उन्नती सोशल फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसायटीत आज शनिवारी (दि. १४) रोजी आयुष्मान भव: तसेच UHND CAMP आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये आरोग्य, रक्तदाब, HB, BSL (R), sputum, मलेरिया आदी मोफत तपासण्या करण्यात आल्या. रुग्णांना मोफत औषोधेपचारही करण्यात आले. लहान मुलांचे नियमित लसीकरण, गरोदर माता नोंदणी, आभा कार्डही लाभार्थ्यांना काढून देण्यात आले. तसेच आहार, पोषण, योगाबद्दलही माहिती देण्यात आली. टीबी, डेंग्यू, मलेरिया आदी आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, विठाई वाचनालय, ऑल सिनिअर सिटीजन असोसिएशन, आनंद हास्य क्लब चे सर्व सभासद, डॉ. अवताडे, डॉ. माधवी गाढवे, रुग्णालयीन कर्मचारी ज्योती शिंदे, सुषमा भवारी, आरिफ शेख, पायल चव्हाण, सागर काची, पूनम खुने, सुनिता पवार, किरण दोडके, विजयालक्ष्मी आकलवाडी, गौरी गुरव, श्रीदेवी पाटील, रोशनी उरकुडे, भाग्यश्री जाधव, पूनम भोसले, रेखा हाडके, अभिलाषा थोरात, संतोष काळे, किशोर गवळी, सुरज शेख आणि परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
डॉ. कुंदाताई भिसे यांनी शिबिरात सहभागी नागरिकांची विचारपूस केली. तसेच ठराविक वयात नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
आरोग्यविषयक विविध तपासण्या करून आजारांचे निदान करून घ्यावे. त्यामुळे गंभीर आजारांसह इतर आजारांवर इलाज करून त्यापासून सुटका करून घेता येते. तसेच आयुष्य तणावमुक्त जगता येते. पुढील उपचारासाठी शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासनही डॉ. कुंदाताई भिसे यांनी यावेळी नागरिकांना दिले.


















