न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२३) :- सुदुंबरे येथील श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधी मंदिरास नुकतीच नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी येथील भक्त-भाविक आणि तेली समाज बांधवांनी भेट दिली. यावेळी मंदिरात भजन आणि कीर्तन झाले.
अनेक भक्त भाविक भक्तिरसात दंग झाले होते. श्री संताजी महाराज मंदिर संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या माध्यमातून भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
यावेळी घोटी इगतपुरी येथील वारकरी समुदाय आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते, अशी माहिती श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे व्यवस्था पक चंद्रकांत जाधव यांनी दिली.













