- नवरात्रीतच उडवणार पक्ष प्रवेशाचा धमाका; आमदारकीचे लागले डोहाळे?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२३) :- येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये इनकमिंग व आउटगोइंगला सुरुवात झाली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला धक्का बसणार असून शहरातील भाजपचे माजी सत्तारूढ पक्षनेते तथा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार उद्धव ठाकरे यांच्या गळाला लागले आहेत. येत्या काही दिवसांत ते मुंबईमध्ये मातोश्रीवर शिवबंधन हाती बांधणार असल्याची माहिती आहे.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते पवार हे नितीन गडकरी यांचे विश्वास मानले जातात. त्यांनी २०१४ मध्ये भोसरी विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५२ हजार मते घेतली होती. पुढे महेश लांडगे भाजपमध्ये आल्याने त्यांना विधानसभा लढवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, निवडणूक लढवण्याची त्यांची सुप्त इच्छा लपून राहिली नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात संधी मिळत नसल्याने त्यांनी गेल्या चार वर्षापासून लातूर लोकसभेत येणाऱ्या लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात लढण्याची तयारी केली आहे. तेथे सध्या शेकापचे श्यामसुंदर शिंदे आमदार आहेत. शेकाप खालोखाल त्या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळेच एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका आहेत.
शहरामध्ये इनकमिंग आउटगोइंगला सुरुवात झाली आहे. भोसरी मतदारसंघामध्ये एकनाथ पवार यांचे प्राबल्य आहे. महापालिकेमध्ये ते सभागृह नेते म्हणून काम पाहत होते. त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला होता. भोसरीतून विधानसभा लढवल्याने त्यांना मानणारा वर्ग आहे. ते भाजपमध्ये नसल्यास त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसणार आहे. त्यांच्या गटातील अनेक नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शेकाप खालोखाल त्या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळेच एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी एकनाथ पवार यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.











