न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२३) :- लेखक वसंतराव देशपांडे यांच्या ” आनंद शोधताना ” या लेख संग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध लेखक भारत सासणे यांच्या हस्ते झाले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी शब्दरंगचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर जोशी होते. दीपक चैतन्य, विनोद लोकरे हे साहित्यीक तर देशपांडे यांच्या पत्नी नम्रता व कन्या अनुश्री दातार, नाबार्डचे रमाकांत कुळकर्णी, श्रीकांत देशपांडे, सुभाष भंडारे, विलास करवीर, हेमंत सोनगडकर व लायन्स क्लब चतुःश्रृंगीचे नागेश चव्हाण, तसेच शब्दरंगचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि अनेक साहित्य प्रेमी या प्रसंगी उपस्थित होते.
शब्दरंग कला साहित्य कट्टा निगडी, या संस्थेने याचे संयोजन केले होते. माधुरी ओक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदानाच्या सामूहिक गायनाने समारंभाचे समापन झाले.













