न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२४) :- वाढदिवस असल्याने फिर्यादीचा मित्र हा फिर्यादीसाठी केक घेवुन आला. त्याने फिर्यादीला बर्थडे विश केले. तेव्हा टपरी जवळ थांबलेल्या आरोपी व त्याचे दोन साथीदार यांनी वाईट वाईट शिविगाळ करत ‘ईधर कोई बर्थडे मनायगा नही’ असे म्हणुन मित्राला हाताने मारहाण करुन तेथे पडलेली विट उचलुन डोक्यात मारुन जखमी केले.
तसेच फिर्यादी त्याला सोडण्यासाठी मध्ये गेले असता त्यांनी फिर्यादीला देखिल हाताने मारहाण करण्यास सुरवात केली, असं फिर्यादीत नमूद आहे. (दि. २५) रोजी रात्री ११.३० च्या सुमारास जगन्नाथ धम सोसायटी जवळ, जॅक्सन बार समोर, बावधन येथे पानटपरी जवळ हा प्रकार घडला.
फिर्यादी अनुराग आनंद झा (वय २५ वर्षे) यांनी आरोपी १) गणेश विठ्ठल माणे (वय ३० वर्षे, २) त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ५५१/२०२४ भा.द.वि.कलम ३२६,३२४, ३२३,५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्र. १ याला अटक केली आहे. सपोनि पांचाळ पुढील तपास करीत आहेत.