न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२४) :- डिझेलजन्य ज्वलनशील पदार्थ हा धोकादायक आहे. याची जाणीव असताना आप-आपसामध्ये संगनमत करुन आरोपी क्र. ५ याने टँकरमध्ये ४,५०,००० रुपये किंमतीचे एकुण ५,००० लीटर डिझेल भरुन आणले. टँकरमधील डिझेलचा आरोपी यांनी साठा केला. सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता मानवी जिवीतास धोका होईल अशी हयगयीची कृती केली. ज्वलनशील मालाचा साठा करण्याबाबतचा परवाना, डिझेल खरेदीची बिले, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ यांचा परवाना तसेच डिझेल सप्लाय, डिस्ट्रीब्युशन व रेग्युलेशन अन्वये ट्रेडींग लायसन्स, अग्निशामक दलाचा परवाना न बाळगता डिझेल विक्री करताना मिळुन आला. ही घटना (दि.२९ /०४/२०२४) रोजी रात्री ९.०० ते (दि.२९/०४/२०२४) रोजी रात्री ११.५५ च्या सुमारास भुमकर चौक, वाकड येथे घडली.
पोलिसांनी टँकर चालक १) बाळासाहेब दत्तराव पौळ (वय-२० वर्ष व्यवसाय-चालक रामु पो येलवडी, सांगुर्डी फाटा, देहुगांव, २) मनोजकुमार पांडे (वय ४९ वर्ष व्यवसाय-चालक रा-एमसीडी / २३.२/५, एम पी नगर धारावी मुंबई), ३) सुभाषचंद्र रामदीन गौतम (वय ४३ वर्ष व्यवसाय चालक रा-सेक्टर नं-५, कोपरखैरणे नवीमुंबई), ४) आकाश रंगनाथ पौळ (वय-२४ वर्ष रा-बनकर वस्ती मोशी), ५) शब्बीर (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ५७८/२०२४ भांदवि कलम-२८५, ३४ अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३,७,१० व मोटार स्पिरीट अॅण्ड हायस्पिड डिझेल (रेग्यलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रीब्युशर अॅण्ड प्रिव्हेंशन ऑफ मॉल प्रॅक्टीसेस) ऑर्डर २००५ चे कलम-२ (ए), (पी) (क्यु आर एस टी), ३(४), ३(५), तसेच पेट्रोलियम कायदा कलम-७ प्रमाणे सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी क्रं १ त ४ अटक आहेत. ऋषिकेश घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे हे पुढील तपास करीत आहेत.