न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मे २०२४) :- प्रतिबंधित केलेल्या पदार्थाच्या सेवनाने मुखाचे कर्करोग व इतर विकार होऊन शारिरीक हानी होऊ शकते, हे माहित असताना देखील आरोपीने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले.
एकुण ४,५२,१५० रुपये किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला याचा साठा केला. पोलिसांनी (दि. ०३) श्री समर्थ जनरल स्टोअर्स, आदीनाथ नगर, गव्हाणे वस्ती भोसरी येथे कारवाई करीत नितेश अनंदा नवघरे (वय ३६ वर्षे, रा. चक्रपाणी रोड, भोसरी) याला ताब्यात घेतले.
विक्रीकरीता बेकायदेशीर साठवणुक केलेला माल जप्त केला आहे. भोसरी पोलिसांनी २९०/२०२४ भा.दं. वि. कलम ३२८,१८८, २६९,२७०, २७२,२७३ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि खाडे तपास करीत आहेत.