न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२४) :- बेकायदेशिररित्या गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी ठेवला. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना माहिती मिळताच त्यांनी (दि. ०५) रोजी ०९.५० च्या सुमारास खालुंब्रे गावात जाणाऱ्या अंतर्गत रोडवर कारवाई करीत महिलेला ताब्यात घेतले.
तिच्याकडून एकुण १,९०,५०० रु. किं. चा माल त्यामध्ये ०३ किलो ८१० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला. तिने हा गांजा विशाल घोजगे (रा. कान्हेफाटा, वडगाव मावळ) याच्याकडुन आणल्याचे तपासात सांगीतले.
नंदा विलास बोत्रे (वय ५४ वर्षे, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) आणि पाहिजे आरोपी (विशाल घोजगे, रा. कान्हेफाटा, वडगाव मावळ) यांच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २८६/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (त्त्) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जायभाये तपास करीत आहेत.