न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२४) :- पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी २९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी हद्दपार केले आहे, असे असताना कोणतीही परवानगी न घेता आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात आला. आपले कब्जात त्याने ५०० रु किं चा एक लोखंडी कोयता जवळ बाळगला.
दरम्यान (दि. ०५) रोजी सायं ६.०० वा. श्रीनाथ चहावाला, साखरे वस्ती, हिंजवडी येथे पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली आहे. अक्षय ऊर्फ सोन्या काळुराम हुलावळे (वय २९, रा. हुलावळे वस्ती, साखरे वस्ती, हिंजवडी) असं त्याच नाव आहे.
हिंजवडी पोलिसांनी ६०८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महा. पोलीस अधिनियम १४२, ३७ (१)१३५ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गोमारे पुढील तपास करीत आहेत.