न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- हिंजवडी पोलीस ठाणे हददीत हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाकडून (दि. ०५) कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तडीपार अक्षय ऊर्फ सोन्या काळुराम हुलावळे (वय २९, रा. हुलावळे वस्ती, साखरे वस्ती, हिंजवडी) याच्याकडे कोयता आढळला. त्याला हद्दीतून दोन वर्ष (२४ महीने) करीता दि. २०/११/२०२३ पासुन हद्दपार केले असताना आदेशाचे उल्लंघन करुन तो हिंजवडी पोलीस ठाणे हददीत मिळुन आला आहे. त्यामुळे त्याचेवर हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०८/२०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), मुंबई पोलीस अधिनियम १४२, ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल होवून त्यामध्ये त्यास अटक करण्यात आले
आरोपी हा हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १७५/२०२४ भा.द.वि. कलम ४८९ (अ) (ब) (क) (ड). ३४ मधील पाहिजे आरोपी असल्याने त्यास गुन्हयात न्यायालयाचे आदेशान्वये वर्ग करून घेवून बनावट चलनी नोटांबाबत विश्वासात घेवून तपास करून त्याचेकडुन २८,००० रु त्यामध्ये ५०० रु दराच्या ५६ बनावट चलनी नोटा हस्तगत केल्या.
सदरच्या बनावट नोटा या आरोपी १) अक्षय ऊर्फ सोन्या काळुराम हुलावळे २) अभिषेक राजेंद्र काकडे, वय २०, रा. साखरे वस्ती रोड, हिंजवडी, ता. मुळशी, जि.पुणे मुळ रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा, ३) ओंकार रामकृष्ण टेकम, वय १८, रा. साखरे वस्ती रोड, हिंजवडी, ता. मुळशी, जि.पुणे ४) विशाल ज्ञानेश्वर लहाने, वय २०, रा. भुजबळ वस्ती, वाकड ब्रीज जवळ, बाकड, पुणे मुळ गाव रा. सेलु, ता. सेलु, जि. परभणी व विधीसंघर्षीत बालक यांनी मिळुन वाई जि. सातारा येथे बनविल्या आहेत.
आरोपी क्रमांक २ ते ४ यांना यापूर्वी अटक केली असुन त्यांचेकडुन बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, शाई, कागद व इतर साहित्य वाई जि. सातारा येथुन जप्त केले असुन आरोपी क्रमांक २ ते ४ हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा जेलमध्ये आहेत
आरोपी अक्षय ऊर्फ सोन्या काळुराम हुलावळे याचेवर यापुर्वी वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्याला विश्वासात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी करुन त्याचेकडुन चोरीच्या १० दुचाकी व २ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. अक्षय ऊर्फ सोन्या काळुराम हुलावळे याचेकडुन हस्तगत करण्यात आलेल्या जप्त वाहनांबाबत गुन्हे उघकीस आणलेले आहेत.