न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ११ मे २०२४) :- देहूगाव येथील योग विद्या धाम शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या योग, बालसंस्कार शिबिराची सांगता झाली. मुलांमधील कला गुणांना वाव मिळावा म्हणून प्रार्थना व ओंकार साधना भाषण, अभंग, नृत्य, योगासने, जिमनस्टिक असे कार्यक्रम शिबिरात घेण्यात आले.
योग बाल संस्कार शिबिरामध्ये मुलांसाठी विविध संस्कृत श्लोकांचे पठण घेण्यात आले. श्लोक मुलांना समजण्यास सहज व सोपे जावे म्हणून ते वेगवेगळ्या विषयांवर बोधपर गोष्टी रूपात समजावून सांगितले. त्याचबरोबर मुलांना योगा बद्दलची आवड निर्माण व्हावी व आरोग्याबद्दलची जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांना पूरक हालचाली, सूर्य नमस्कार, लहान मुलांना उपयुक्त होतील, अशी योगासने शिकविण्यात आली.
योग बाल संस्कार शिबिर हे योग विद्या धाम देहूचे अध्यक्ष योग अध्यापक दत्तात्रय भसे व डॉ. शिल्पा नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षक गणेश हगवणे यांनी मार्गदर्शन केले.















