न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२४) :- कंटेनर (आर जे ३२ जी सी ८५४०) वरील चालकाने तळेगावकडून चाकणकडे जात असताना मयुर हॉटेल समोरुन पायी जाणाऱ्या तरुणाला धडक दिली. त्यामुळे तो खाली पडला. क्षणार्धात कंटेनरचे चाक त्याच्या डोक्यावरुन, छातीवरुन गेले. तसेच हाता पायास गंभीर मार लागुन तो जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
आरोपी कंटेनर चालक तरुणाच्या मृत्युस कारणीभुत झाला. कंटेनर चालक अपघात ठिकाणी कंटेनर सोडुन निघुन गेला आहे. हर्षल हेमलाल खडके (वय ३६ वर्ष) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना (दि.१०) रोजी सकाळी ०८.१५ वा चे सुमारास घडली.
याप्रकरणी मयत तरुणाच्या ५७ वर्षीय आईने अज्ञात कंटेनर चालक (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ३२१/२०२४ भादवि का क २७९,३०४ (अ) मो वा का क १८४,१३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मसपोनि गावडे पुढील तपास करीत आहेत.












