न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२४) :- दररोज ढगाळ वातावरण होत आहे. तसेच ऊन मोठ्या प्रमाणावर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी देहू नगरपंचायतीच्या वतीने मतदान केंद्राबाहेर मंडप घालण्यात आला आहे.
मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी देहू नगरपंचायत हद्दीतील १८ हजार ९७५ मतदार मतदान करणार आहेत. मतदानासाठी २० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. माळवाडी आणि देहूतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्र आहेत.
तलाठी सूर्यकांत काळे म्हणाले, “नगरपंचायतीच्या हद्दीत देहू, माळवाडी आणि विठ्ठलवाडी या तीन गावाचा समावेश होतो. मतदान प्रक्रियेसाठी गावातील जिल्हा परिषदेची शाळा सज्ज आहेत. १८९७५ मतदार असून वीस मतदान केंद्र आहेत. यात माळवाडीमध्ये ४, देहू आणि विठ्ठलवाडी या दोन्ही गावातील मतदान देहूतील प्राथमिक शाळेत होणार असून येथे १६ मतदार केंद्र आहेत. पुरुष मतदारसंख्या ९८१० असून, ९१६३ महिला मतदार आहेत. तर दोन तृतीयपंथी मतदार आहेत.















