न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२४) :- तळवडेतील गणेश नगर येथील एका पत्राशेडला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
गणेश नगर येथील एका पत्रा शेडमध्ये नचिकेत करमाळकर यांचा अभंग फूड सर्व्हिसेस हा दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचा व्यवसाय होता. हा व्यवसाय अनधिकृत असल्याचे अग्निशामक दलाने सांगितले. या शेडमध्ये मोठ्या आकाराचे फ्रीज होते. शेडमध्ये अचानक आग लागल्याची माहिती सकाळी आठच्या सुमारास अग्निशामक विभागाला कळाली.
घटनास्थळी अग्निशामक दलाचे त्वरित चार बंब घटनास्थळी दाखल करत अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.














