निगडी चौकात जाणाऱ्या वाहनचालकांची झाली गोची…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १३ मे २०२४) :- पुणे मुंबई महामार्गावर निगडी येथे ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. परिणामी ग्रेड सेपरेटरमधून बाहेर न पडता वाहनचालकांना उड्डाणपुलावरून पुढे जाऊन वळसा मारून निगडी चौकात यावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.
निगडी येथे दिवंगत मधुकर पवळे उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वी ग्रेड सेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर मध्यंतरी पुलापासून सुमारे २५ फूट खोदकाम करण्यात आले होते.
अनेक वाहनचालक तेथून बीआरटी मार्गातून मागे येऊन वळतात. तसेच बीआरटी मार्गातून पुन्हा सेवा रस्त्यावर उलट्या दिशेने येतात. अपघात होण्याची शक्यता आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल चालकांनी उपस्थित केला आहे.











