न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- हिंजवडीतील लक्ष्मी चौकाकडून टाटा टी जंक्शनकडे येणा-या सार्वजनिक रस्त्यावर टाटा टी जंक्शन चौक येथे दुचाकी वरील चालकाने गाडीवर तिघांना बसवुन बेदरकारपणे, हयगयीने पोलीस इशा-याकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून पोलिसाला जखमी केले आहे.
हा अपघात (दि. १९) रोजी १०.१५ वा. घडला. हिंजवडी वाहतुक विभागाच्या वतीने आरोपी वाहनचालक अरनब उत्तमदे (वय-२६ वर्षे रा. नेरे, दत्तवाडी पुणे) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात ६५९/२०२४ भा.दं. वि. कलम २७९, ३३७ मो.वा.का. १२८(१)/१९४ (सी), ३(१)/१८१, १८४, १३२(१)/ १७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि धुमाळ तपास करीत आहेत.















