न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- काळया बाजारात वाढीव दरात विक्री करण्यासाठी गॅस टँकरमधुन चोरी करून गॅस काढून तो व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरला. दरम्यान तो भरताना केलेल्या कृतीमुळे गॅस टँकरचा स्फोट झाला. मानवी जिवीतास धोका निर्माण होईल याची जाणीव असताना देखील आरोपी यांनी हे कृत्य केले आहे. तसेच मालमत्तेची हानीकरुन नुकसान केले आहे.
हे काम बेकायदेशीर असल्याचे माहित असतानासुध्दा पैश्याच्या मोबदल्यात जागा मालक आरोपी नं १ यांनी विनापरवाना आरोपी नं २, त्याचे पार्टनर आरोपी नं ३ व ४ यांना हॉटेल भाडयाने दिले. आरोपींनी संगनमताने मोकळया जागेत गॅस टैंकर क्रमांक जी.जे / ०६, ए.एक्स / ५४१८ वरील चालक आरोपी नं ५ व ढाब्यावरील आरोपी नं २ व त्याचे इतर साथीदार यांनी हे गैरकृत्य केले आहे.
हा प्रकार (दि. १९) पहाटे ०३:३० ते ०५:०० च्या दरम्यान मोहितेवाडी येथे चाकण-शिक्रापुरकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या गुरुकृपा ढाब्यासमोर घडला. आरोपी १) चैतन्य गणपत मोहिते (वय ५० वर्षे, रा. मोहितेवाडी, ता.खेड, जि. पुणे), २) सुरेश रुपाणी (रा. राजस्थान), ३) सुदर्शन कान्होरकर (रा. दावडी, ता.खेड), ४) सोमनाथ पोतले (रा. मोहितेवाडी, ता.खेड, जि. पुणे), ५) मुस्ताक कमलुउद्दीन यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात ३४०/२०२४ भादवि कलम ३७९, ३०८, ४०७, २८५, ३३६, ४२७, ३४ सह जिवनावश्यक वस्तु अधिनिय मकलम ३ व ७ व स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३४,६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी क्र १ व ३ अटक आहेत. घटनेचा पुढील तपास पोनि पाटील करीत आहेत.















